प्राची लवकर कर!! शाळेला उशीर होईल! आई रागावाली. तशी मी बास्केट घेतली आणी स्कूटर वर पुढे उभे राहीले.
प्राची घट्ट धर! तोंड उघड ठेवू नकोस! धूळ तोंडात जाईल! आई म्हणाली.
पण तरी मी मधून मधून तोंड उघडत होतेच. तेवढीच आपली गम्मत.
स्कूटर चालू झाली. आम्ही आता गल्लीतून मुख्य रस्त्याला आलो. कीती तरी मोटारी, स्कूटर आमच्या पुढे जात होत्या. सारखे आपले हॉर्न वाजवत होते.
मी आईला म्हणाले जोरात चालव! उशीर होतोय! आई म्हणाली गर्दी कीती आहे. खड्डे तरी कीती. त्यात सारे नुसते मधे मधे धडपडतात कीती.
मी आकाशात बघितले. निळ्या आकाशात ढग च ढग होते. ते सुद्धा आमच्या बारोबर येत होते. ते नेहमी शाळेत सुद्धा आमच्या आधी पोहचतात.
आई ढग आपल्या आधी का पोहचतात? ते आकाशात असतात म्हणून.
तू स्कूटर आकाशातून का नाही चालवत?
बेटा स्कूटरला पंख नाहीत. म्हणून ती उडत नाही.
भो! भोSS! गुर्र! गुर्र! क्यांव क्यांव! असे भांडत कुत्री एकदम मधेच घुसली. मला भीतिच वाटली.
स्कूटर एकदम हलली! माझा तोलच गेला. माझ डोक आपटल. स्कूटर मधेच रस्त्यात थांबली. बास्केट खाली रस्त्यात पडली.
मी रडायला लागले. माझ नाक दूखत होत म्हणून मी डोळे वाकडे करून नीट बघितले.
नाक तर वाकड आणी चपट झाल होत.
मी ते हातानी झाकून घेतल.
कुणीतरी माला उचलून कडेला उभे केल. आई ने स्कूटर कडेला लावली. लोकांनी बास्केट आणून दीली.
लोक म्हणाली - डॉक्टर कडे घेवून जा. नाकाला लागलेल दिसतय!
आईने माला जवळ घेतल आणी म्हणाली बघू. तीने माझे हात जोरात हिस्का देत सरकवले. म्हणाली येवढ काही नाही.
तीने पर्स मधून रूमाल काढला. माझ्या लक्ष्यात आंल की ती काय करणार होती. मी नकोना!! आणखी दूखेल. असे म्हणाले.
तीने रूमालानी माझे नाक घट्ट पीळून टाकले. मला आणखी दुखले. तू वाईट आहेस! दुष्ट आहेस! असे मी रडत म्हणाले. तीने मला रूमाल दाखवला. ती म्हणाली बघ रडून कित्ती घाण करून घेतलय ते नाक. शाळेत मूल शेंबडी म्हणतील. ते चिडवतील! चालेल तुला?
मी रागाने म्हणाले तुझ नाव सांगेन टीचरला!
ती म्हणाली अस्स होय??? मग तुला शाळेला गेल पाहीजे. जाणार का तू? का आपण घरीच जायच. नाहीतरी तुझ नाक चपट झालच आहे.
असुदे! मी शाळेत जाणार म्हणजे जाणार.
तुझ नाक दूखत असेल ना?
असुदे! मी तुझ नाव सांगणार म्हणजे सांगणार.
बर बाई! टीचर मला शिक्षा करतील? हो!!! करूदेत! मग तू सुद्धा रडशील.
मी लगेच स्कूटर वर चढले. आईने जोरात स्कूटर चालवली.
आम्ही शाळेत पोहचलो. शाळा सूरू झाली होती. आम्ही दरवाज्यात उभे राहीलो. मी नाक झाकूनच उभी होते. टीचरने माझ्या नाकाकडे पहात विचारले काय झाल?
आई ने टीचरना सगळ सांगितले. टीचर ने मला उचलून घेतल आणी हळूच जागेवर बसवल.
मी नाक झाकून घेतल. आणी म्हणाले तीने केल माझ नाक वाकड. मी दरवाज्या कड़े बघितले. तिथे कोणीच नव्हतं. टीचर म्हणाली तू आज माझ्या कडेच रहा. आईला वाट बघू दे. मी मोठ्याने चालेल म्हणाले.
मी नाक झाकूनच बसले. मूलानी गाणी म्हंटली. मी गप्पच् होते.
थोड्या वेळाने टीचर ने मला तिच्या टेबलावर उभे केले. तरी मी नाक हातानी झाकूनच ठेवल होत. सगळ्यानी बघायला नको!
टीचर म्हणाली - प्राची धीट आहे. कुत्री मधे आली आणी जोरात भूंकली. प्राची घाबरली नाहीच.आईने झटकन स्कूटर थाम्बवाली. गडबडीत तीच डोक स्कूटर वर आपटल. तीच नाक दूखायला लागल. तरी ती मुळीच रडली नाही. ती शाळेला सुद्धा आली.
मूलानी खूप जोरात टाळ्या वाजवल्या. काही बाकावर उभी राहिली. मूल म्हणाली प्राची आम्हाला तुझ नाक बघायच आहे. मी नाकावरचा हात बाजूला केला.
मूल म्हणाली तुझ नाक छानच आहे. ते मुळीच वाकड झाल नाही. तू धीट आहेस! तू शूर आहेस! मूलानी परत टाळ्या वाजवल्या. मला तर गम्मतच वाटली.
तेवढयात घन्टा झाली. शाळा सुटली! आम्ही सर्व धावतच बाहेर आलो. आई वाट बाघतच होती.
मी आईला सांगितले - मूल मला धीट आहेस! शूर आहेस अशे म्हणाली. आई म्हणाली आहेच मुळी माझी प्राची!
Comments
Post a Comment