परिक्षा आणी निकाल
माझे आपले असे मत आहे की आपल्या वेळी वेळी मार्क बरेच महाग होते आता ते स्वस्त झाले आहेत. अर्थात काळानुसार बदल हे होणारच! पण सर्वच बदल पचत नाहीत हेच खरे.
बरे त्या वेळच्या आपल्या मार्काचे पुनर्मूल्यांकन (उत्त्तर पत्रिकांचे नव्हे) अत्ताच्या च्या शाळा करून देतील का? असा प्रश्न पडला.
असो सारांवशात आमच्या इथे निकाल जाहिर होताच असे घडले. आपणास कुतूहल असेलच. म्हणूनच लिहिता झालो इतकेच.
मला 89% टक्के इति 7 वीतील कन्या.
माझे 93% टक्के इति 4 थी तील पुत्र.
सातवित इतकेच पडू शकतात. तुला कळेलच.
अचानक प्रश्न आला!!
बाबा तुला कीती पडले होते? सांगना! आई तू विचारना. म्हणजे सांगेल तो. नाहीतरी तो तुला कधीच नाही म्हणत नाही.
पार्टी करायची का अत्ता? माझा विषय बदलण्याचा केविलवाणा प्रयत्न.
निरागस चेहरा, डोळ्यात कशी जीरली असे काहीसे भाव दाखवून मी यातली नाहीच असे सौ ने परस्पर नेत्र पल्लवी तून सांगून टाकले.
व संधी साधून ती म्हणाली मला काम आहेत. आणी ती आत निघून गेली.
चिरंजीवांच्या डोक्यातूंन विषय पूरता गेला नव्हता. आंत बघत तो म्हणाला.
‘कपाटात नक्की सापडतील’ हो न बाबा? म्हणूनच आई कपाटात शोधत आहे. इति चिरंजीव!
अय्या हो! इति कन्या.
काय सापड़तील? पार्टी साठी काय शोधायचे? अत्ता जातो आणी आइस्क्रीम घेवून येतो. माझी सारवासारवी.
आई कपटात बहुतेक तुमचे मार्क शोधत आहे. पुत्राची पुष्टि.
आतून सौ चे स्पष्टीकरण आले.
छे काही तरीच!! कपाट लावत होते.
नाहीच मूळी असे म्हणत दोघे आत पळाले.
मीनीटातच सारे परत. कन्येच्या हातात कसल तरी प्रमाण पत्र. बाबा A++ अस लिहिले आहे. आई म्हणाली बहुतेक 65 की 68 असतील. कन्येने माझी उलट तपासणी सूरू केली.
बाबा हे फारच poor! Seventy Five तरी चालले असते. कन्येने आपले मत मांडले.
तू tuition ला का नाही गेलास? इंजीनियरिंग चे पण ट्यूशन क्लास असतात.
मनीषा ताई जाते आहे. ती पण engineer होणार आहे! हो की नाहीग आई?
पुत्रा ला बरेच प्रश्न पडलेले दिसत होते.
बर झाला का बघुन. द्या ती गुण पत्रिका परत. ऑफिस मधे कधी कधी लगाते ती. सौ ने आवरते घेण्या साठी प्रयत्न केला.
साहेब मार्क विचारतात. गुण पत्रिका मागतात. आणखी काय विचारतात.? Viva परीक्षा घेतात? चिरंजीव विचारते झाले.
रिझल्ट झालच आहे! आपण सिनेमा बघायचा का????
सौ ने हुकमी वाक्य टाकले. कसही करून विषय बदलायचा होता.
चला आपणच ठरवू. बाबा नको. तो फालतू सिनेमे निवडतो. चला आपण पेपर बघू.
सौ ने अखेर यशस्वी पणे विषय संपवला होता.
ती मला icecream चे बघा असे दटावून मुलाना घेवून स्वयंपाक घरात गेली.
आणी मी मोकळा श्वास घेत आइसक्रीम च्या तजवीजी साठी घरा बाहेर पडलो.
Comments
Post a Comment