Skip to main content

माकडांचा उपवास

  • माकडांचा उपवास

रिप रिप पावसाची ओलीचीम्ब रात्र सरली. थीजलेल्या पानानी मनसोक्त सळसळ केली. त्या सळसळीला पक्षानी साथ दीली. झाडां झाडांतून किलबिल ऐकू येऊ लागली. किलबिल ऐकून माकड जागी झाली.   जागे झालेल्या माकडानी सकाळची काम सूरू केली. काहीनी आपल्या शेपट्या तपासल्या,  तर काहीनी उड्या मारून बघितल्या. झाड कशी मागे राहातील? त्यानिहि फांद्या गदगदून हलेस्तो जोरदार आळोखे पिळोखे दीले. पाना पाना वरून ओघळत मोठाले थेंब जमिनीवर पडले.

केशरी उजेड पूर्वे कडून पाझरायला लागला. आकाशांतील चांदण्या आवरत घेताना नाराजीत म्हणाल्या, या केशरीला ना सदोदीची घाई! पहाता पहाता पहाट नकळत अवतरली. ढगांचे आकार प्रगट होत गेले. मागे रेंगाळलेल्या चांदण्या डोळे पुसत निरोप घेत होत्या. उद्याच्या रात्री पर्यंतचा विरह त्याना सतावित असावा. चांदोबा ने तर कधीच निरोप घेतला होता. बरचस आकाश अजून काळोखात ढगांच्या दूलइत गुरफटलेल होतच. 

पूर्वेकडचा लाल, पिवळा, नारंगी मिश्रित उजेड अजून झाडांच्या शेंड्या वरून खाली ओघळायचा होता. 

पाखरांची वेगळीच अडचण होती. ओली गार पीस वाळवायला पांढऱ्यांची वाट बघत होती. पांढरा तर अजून उगवायाचा होता. माकडानाही तो पांढरा  हवाच होता. अंगावरच्या ओल्या चिंब केसांच ओझे त्यानाही सतावित होत. पण सार काही सांगतील तर ती माकड कसली?

यथावकाश पांढरा अवतरला. दगड, धोंडे यांच्या बरोबर डोंगर, दऱ्या, झाडे, फूले आणी आकाशा सकट सर्वाना आपापली ओळख परत मिळाली. माकडानी किलकिल्या डोळ्यांनी परिसर न्याहळला.

माकड म्हणाली सार काल होत तसेच आहे. म्हणजे हुंदडायला अडचण नाहीच.

मोठी पाखरे थव्या थव्या नी आकाशात विरून गेली. चिमुकल्या पाखरानी झाझाडातून भटकंती सूरू केली. पोटा साठी दाही दीशा - दूसर काय?

माकड सकाळच्या सभे साठी झाडा खाली जमली. आज आपलेच कान तर उपटले नाहीना जाणार अशी शंका अनेकांना सतावू लागली. कच्ची बच्ची टिवल्याबावल्यात हरवली होती.

धप्प!!! असा आवाज झाला. एका मस्तवाल माकडाने झाडावारूंन खाली उडी घेतली होती. हाच तो धष्ट पुष्ट दादू! साऱ्यांचा महोरक्या! म्हातारपणा मूळे स्वारी जरा खंगली होती तरी ऐट आणी रुबाब तरूणाना लाजवणारा. छोटी सारी त्याला बिलगायची पण बाकी सारे सुरक्षित अन्तरावरून बोलायचे.

जमली का सारी? त्यान नजर फिरवत चौकशी केली. मी सुद्धा आहे! गिल्लू किनऱ्या आवाजात ओरडला. गिल्लू एक लाडावलेल आणी म्हणून शेफारलेल पिल्लू माकड होत.

तर मग सर्वांबरोबार तू पण लक्षदेवून ऐक - दादू ने हुकुम सोडला. 

आपला सर्वांचा अत्ता पासूनच उपास सूरू.

आमचा पण? पिल्लू मंडळी विचारती झाली.

होSSय! असे दादू ने मोठ्याने सांगितले.

आपण अत्ता चालत नदी पलीकडच्या हनुमान मंदिरात जायच आहे. जाताना नदीत सर्वानी आंघोळ करायची आहे

 मग देवळात सर्व मिळून प्रार्थना करू.

या नतंर उपवास सुटेल. नियम मोडणाऱ्याना कठोर  शिक्षा असेल.

गिल्लुला हे उपवासाच मात्र अजिबात पटल नाही. त्याने सूर लावला. हे काहीतरीच! काल रात्री मिट्ट काळोख होता म्हणून काहीच खायला मिळाल नाही. रात्रभर उपवास आणी तरी अत्ता पासून परत उपवास करायचा? बाकी पिल्लू मंडळी नी सूर मिळवला - हो ना! हे काहीतरीच! हां आमच्यावर अन्याय आहे.

दादूने त्याला फक्त आपल्या हातातील छडी दाखवत उत्तर दीले.

दादूने देवळाची वाट धरली.  सारी मुकाट चालायला लागली. सगळ्यांना दादूचा रागच आला होता. तरी बीच्चारी पाय ओढत चालत होती.

तेवढ्यात गिल्लू ओरडला! ते बघा ते! कित्ती पेरू झाडावर. त्याला कोणीच साथ दीली नाही. सारे मुकाट चालत होते.

आणखी पुढे गेल्यावर कडेला एक केळीची बाग होती. सर्वांच्या तोंडाला पाणी सूटल. हाहा! मस्त! आणी कोणी रखवालदार पण नाही. गिल्लू ओरडला. त्याने आनंदाने उड्या ही मारल्या.

दादूने काठी उंचावली व म्हणाला हे सार अति होतेय!

दादूने एकदा सर्वान कड़े नुसते बघितले. सारे गुपचुप मान खाली घालून चालत राहीले.

गिल्लू ला मात्र राहवले नाही. तो पळत, उड्या मारत केळी च्या बागेत शिरला. आणी बघता बघता परत आला.

आता त्याच्या हातात दोन दोंन केळी होती. माकड पिल्लानी गलका केला - आम्हाला पण हवि.

काय हव सर्वाना! दादू ने रागावून काठी दाखवत विचारले.

इतरानी फक्त गिल्लू कडे बोट दाखवली.

गिल्लुच्या हातातली केळी पाहून दादू ला रागच आला. काय शिक्षा करावी असा विचारात असतानाच…..

लगेच गिल्लू म्हणाला मी तर फक्त दोन दोंन केळी आणली आहेत. उपास सुटे पर्यंत मुळीच खाणार नाही.

दादुला गिल्लुची चलाखी लक्षात आली. ज्यास्त गोंधळ नको म्हणून दादू इतकेच म्हणाला - चालेल! पण खायची मुळीच नाहीत उपवास सूटेस्तोवर.

होSS तर! गिल्लू ओरडला.

लगेच इतर माकड पिल्ल म्हणाली आम्ही पण! आणी लहान मोठी  सारी माकड केळीच्या बागेत शिरली.

मिनिटात सारे परत. सर्वांच्या हातात केळीच केळी होती. 

गिल्लू ने आपल्याला शह दिला हे दादू च्या लक्षात आले. तो फक्त इतकेच म्हणाला चाला आता भराभर.

थोडे पुढे जाताच मागे खिदळण्या चा गलका ऐकू आला. सारी माकड गिल्लू कडे पहात हसत होती.

गिल्लू ऐटीत केळी सोलत होता.

दादू ने काही विचारायच्या आंत गिल्लू म्हणाला मी फक्त केळी सोलली आहेत. खाणार मुळीच नाही. म्हणजे अस की प्रार्थना झाली की लगेच खाता येतील. जीव कासाविस व्हायला नको - भूकेने.

दादुला काय बोलावे हे कळेचना. गिल्लू ची गुगलीच तशी होती. दादू फक्त म्हणाला चालेल. आणी तो पुढे वळून चालू लागला. तरी त्याचे सारे लक्ष मागेच होते.

आता गिल्लू आणखी काय खेळी करेल या विचारानी तो आणखी चिंतेत पडला. 

एक शंभर एक पाउले पुढे जाताच मागे मोठा गोंधळ उडाल्याचे दादू च्या लक्षात आले. अत्ता आणी काय असेल? या शंकेने दादू मागे वाळला. 

पाहतो तो काय. गिल्लू केळी चक्क तोंडात कोम्बत होता. त्यानी ती सारी केळी गालात साठवली.

मग मोठ्या काष्टाने म्हणाला  म्ही खाSसSS #*%%*&नाहीच!! त्याच तोंड भरेल होते पण  थोडक्यात तो म्हणाला - मी खाल्ली नाहीत. फक्त गालात साठवली आहेत. मी उपवास मोडलेला नाहीच.

बाकीची सारी पिल्लू माकड किंचाळली - चालेल! चालेल! चालेल - हो ना दादू.

माकड पिल्लानी तर दादूची फजीतीच केली होती. 

दादू हळूच म्हणाला चालेल!! आणी तो पुढे बघत चालू लागला. अत्ता दादूचे पाय ही दूखायला लागले होते. त्यात उन अगदी कडक होत. त्याच्या लक्षात आले सर्वानकडे केळी तरी आहेत. आपल्या कडे तर काहीच नाही. म्हणजे प्रार्थने नंतर आपणच उपाशी राहणार. 

दादू च्या लक्षात आले - अरेच्चा! ही टेकडी उतरली की लगेच नदी. मस्त पोहू म्हणजे बर वाटेल. पाण्यात उतरल्यावर उन्हा चे काय?

इतक्यात - आईआई गSSS! अशी किंकाळी ऐकू आली. झर्र्कन दादू जागेवर मागे वळला.

गिल्लू जमिनीवर पडला होता. त्याने हाताने पोट गच्च धरले होते. त्याचे डोळे अर्धवट बंद होते. जीभ अर्धवट बाहेर आली होती. श्वास मंद चालू होता.

काही तरी चावल असेल - एक माकड म्हणाल. नाही नाही! हां उपवासाचा परिणाम आहे. त्याची आई म्हणाली व तीने रडायला सुरवात केली. बाकीची माकड म्हणाली होSSतर! आम्हाला पण गरगरतय!

दादू पुढे झाला. त्याने दोघा तीघाना पाणी आणायला पाठवले. बाकी पिल्लानी शेपटीने वारा घालायला सुरवात केली. 

दहा मिनिटात माकड पाणी घेवून आली सुद्धा! दादू ने पाणी शिंपडल. गिल्लू दचकूंन जागा झाला.

आईने काळजीत विचारले - काय होतेय तुला. काही चावल का तुला. वाघ दिसला का तुला?

गिल्लू म्हणाला - एकदम गेली.

सर्वानी विचारल - काय ते? कुठे गेली? कोण होत ते?

गिल्लू म्हणाला - घट्ट धरून ठेवल होत त्याना मी. एकदम आतच पडली.

कोणाला काहीच कळाल नाही.

आईने विचारले काय घट्ट धरले होते? कोणी धरले होते?

गिल्लू ने सर्वांन कडे भीत भीत पाहिले.

दादू म्हणाला सांग सांग! घाबरू नकोस! बिनधास्त सांग! तुला कोणी ओरडणार नाही.

गिल्लू हळू आवाजात म्हणाला- गालात घट्ट धरली होती ती केळी डायरेक्ट पोटात पडली. आणी तो एकदम गम्भीर चेहरा करून गप्पच बसला.

दादू ने मोठ्याने हसायला सुरुवात केली. हसता हसता तो म्हणाला - त्यात काय झाले!! गालातली केळी पोटात गेली. गालात ठेवलेले हळू हळू पोटात तर जात.

गिल्लू ने दबक्या आवाजात विचारले चालेल??? दादू जोरात म्हणाला म्हणजे काय चालेलच - हे नेहमिच तर होत.

बाकी सर्वानी केळी लगेच तोंडात कोम्बली.

सर्व माकड केळी खाता खाता ओरडली आमची पण केळी डायरेक्ट गालातून पोटात पडली. 

दादू बिचारा पहातच राहिला. त्याच्या शिवाय सर्वान कडे केळी होती. इतक्यात गिल्लूने त्याला खाकेत लपवलेली दोंन केळी दीली व म्हणाला भूक लागली असेल! सावकाश खा!!! दादूच्या डोळ्यात पाणीच आल.



Comments

Popular posts from this blog

Who is a Celebrity?

I was born and brought up in a Metropolis like Mumbai.  I had a pretty contented childhood. My early school days were full of fun. On the way to the school there happened to be a temple. Outside the temple stood a tall lean lady, with a short cane in her hand and a cow in toe. She wore a thick round glass spects. She always carried a sack. The sack was made by loosely knotting four corners of a square piece of cloth, into a big central knot.  The centrally knotted cloth held strands of grass, and vegetable peels collected from the vegetable market. She spoke in a high pitch shrill voice even to the cow she tagged along all the way to the temple. She brandished the cane as she spoke. I and my friends were a little scared of the cane. Evevery day on the way to the school we spent a few minutes to watch the cow. She just shooed us away the moment we lingered around. Occasionally my mother gave me 10 paise. Which I handed over to the cow woman. In return she allowed each one of...

नाकाची गम्मत!

प्राची लवकर कर!! शाळेला उशीर होईल! आई रागावाली. तशी मी बास्केट घेतली आणी स्कूटर वर पुढे उभे राहीले. प्राची घट्ट धर! तोंड उघड ठेवू नकोस! धूळ तोंडात जाईल! आई म्हणाली. पण तरी मी मधून मधून तोंड उघडत होतेच. तेवढीच आपली गम्मत. स्कूटर चालू झाली. आम्ही आता गल्लीतून मुख्य रस्त्याला आलो. कीती तरी मोटारी, स्कूटर आमच्या पुढे जात होत्या. सारखे आपले हॉर्न वाजवत होते. मी आईला म्हणाले जोरात चालव! उशीर होतोय!  आई म्हणाली गर्दी कीती आहे. खड्डे तरी कीती. त्यात सारे नुसते मधे मधे धडपडतात कीती. मी आकाशात बघितले. निळ्या आकाशात   ढग च ढग होते. ते सुद्धा आमच्या बारोबर येत होते. ते नेहमी शाळेत सुद्धा आमच्या आधी पोहचतात. आई ढग आपल्या आधी का पोहचतात?  ते आकाशात असतात म्हणून.  तू स्कूटर आकाशातून का नाही चालवत? बेटा स्कूटरला पंख नाहीत. म्हणून ती उडत नाही. भो! भोSS! गुर्र! गुर्र! क्यांव क्यांव! असे भांडत कुत्री एकदम मधेच घुसली. मला भीतिच वाटली. स्कूटर एकदम हलली! माझा तोलच गेला. माझ डोक आपटल. स्कूटर मधेच रस्त्यात थांबली. बास्केट खाली रस्त्यात पडली. मी रडायला लागले. माझ नाक दूखत होत म्हणून मी डोळे ...

Evening Sun

Sun looked back, "Oh! Like me the day too has progressed." that is what he murmured.  Sun was treading the last leg of its daily path. The last leg being slippery, a lot of efforts went in to hold on to the point. Yet the Sun could barely manage to float over the surf. At the same the Sun was busy in scattering the crimson streaks around the western horizon. The fluffy clouds made every effort to gobble up the streaks. Streaks were too slippery. The agile streaks simply sprayed all the hue over the clouds. The turbulent wave were bent upon grabbing the Sun and pull it in. The waves for long wished to immerse the Sun in the vast sea and rob the sheen. Waves hoped to see the crinkled, wrinkled Sun to emerge out and beg for the lost sheen. The chance to witness irresistible opportunity is what draws me to the beach. You will find more of such write-up in digital media @ INDIAN FLAVOUR SHORT STORIES . Part - 1 / 2 /3 @ AMAZON /Books / e-books