ऊंच ऊंच झाडानी वेढलेला जमीनीचा त्रिकोणी तुकडा असे वर्णन लागू पडेल अशी एक बाग आमच्या घरा जवळ आहे. कडे कडेने केलेली अरूंद अशी फरसबंदी वाली पाउल वाट गुलमोहरांच्या झाडाना वळसा घालत बाळ गोपाळांच्या झोपाळयाच्या बाजूनी जात वळणा वळणानी बागेला वळसा घालते. वाटेत अंतरा अंतरावर बाक बिचारी कोणी बसेल या आशेवर कायम उभी कशी राहू शकतात असा माला प्रश्न पडतो. पाउल वाटेच्या आतल्या अंगाला मातीत तुरळक गवताची बेट. त्यांच्यात लपलेले पण जमीनीतून उगवलेले नळ वाले खुजे पाण्याचे लोखंडी पाइप. त्यातून गळलेल पाणी. या पाण्या च्या कृपेने झलेला चिखल. त्यांच्या भोवती पहूडलेले रबरी पाईपाची वेटोळी. मध्यभागी मात्र मातीच माती. साधारण अस स्वरुप आहे त्या बागेच.
मी मात्र आलो की एक दोंन बाकावर निवांत बसल्या शिवाय जात नाही. बाकांच्या सोबतीत आयुष्याची उजळणी हां मझा ठरलेला विरंगुळा आहे. तस बर असत बाकांच. तुम्हाला ती कधीच टोकत तर नाहीच शिवाय मूक साथ मात्र हमखास देतात.
सकाळची वेळ. बागेत फारशी वर्दळ नव्हती. म्हणजे एरवी ही या वेळेस वर्दळ अशी नसतेच. एखाद दूसरे माझ्या सारखे म्हातारे आणी चुकुन माकून आलेली शाळेची मुल.
मी आपला एकटाच बाकावर बसून रीकामी नजर इथे तिथे फिरवत होतो. झोपाळे तसे दूर होते म्हणून मूलांचा गलका ऐकू येत नव्हता.
आजोबा! आजोबा! बघाना, मला काय मिळाल ते.
सारीका, माझी नात मला म्हणाली.
तिच्या चिमुकल्या ओंजळीतल काहीतरी मला दाखवत होती.
मी तीच्याकडे बघताच ती म्हणाली - ते ना अगदी खाली गवतावर नुसत बसल होत.
मी हळूच फुंकर घातली. फक्त त्याचे पंख थरथरले. ते काही उडाल नाही की पुढे गेल नाही. म्हणून ना मी ते उचलून घेतल.
हे सार ती तिच्या ओंजळीत विसावलेल्या फूलपाखरा बद्दल म्हणत होतीं.
मी विचारच करत होतो की तीला सांगावे का - की ते फूलपाखरू मेलेल आहे. ते परत अत्ता कधीच उडुशकणार नाही.
मी तिच्या चेहऱ्या कड़े पाहिले आणी माला वाटले तीला अजून काही तरी सांगायचे आहे.
ती म्हणाली मी ना अत्ता हे फूलपाखरू घेवून जाणार आहे.
मी दूजोरा दिला - शाळेत घेवून जाणार का? बाईना दाखवायला?
कपाळावर आठ्या.
काय आजोबा! तुमच आपल काहीतरीच! असा आविर्भाव चेहऱ्यावर. सारीकाने मला झटक्यात मूर्खात काढले होते.
आपण घरी जाताना वाटेत देवूळ लागेल की नाही? त्या देवाला मी सांगणार आहे.
देवाला काय सांगणार आहेस तू? माझा सरळ प्रश्न.
याला एकदाच थोडावेळ उडण्याची शक्ति दे. म्हणजे ते उडत तुझ्याकडे येऊशकेल.
मी विचारले का ग ते उडत देवा कडे गेल पाहीजे? आणी ते उडत गेल्याने काय होईल?
सर्वच मेल्यावर देवाकडे जातात की नाही? म्हणून. शिवाय अस देवाकडे गेल्याने देव त्याला मुक्ति देईंलना?
मी फक्त होकारात मान हलवली.
Comments
Post a Comment